MahaTransco Recruitment- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (महापारेषण) कळवा आणि बोईसर येथे विजतंत्री मध्ये ITI उत्तीर्ण झालेल्यांसाठी 87 विजतंत्री शिकाऊ (Apprentice) पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्जप्रकिया सुरु झाली. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पद्घत ऑफलाइन पोस्टाद्वारे आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 1 मार्च 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
MahaTransco Recruitment Apprentice पदांचा तपशील –
क्र. | पद (Apprentice) | कार्यालय | जागा |
1. | वीजतंत्री | कळवा | 62 |
2. | वीजतंत्री | बोईसर | 25 |
MahaTransco Recruitment शैक्षणिक पात्रता –
- मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण.
- मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री ITI उतीर्ण.
👉 एअर इंडिया मध्ये 386 पदांची भरती सुरू 👈
MahaTransco Recruitment वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय- 05 वर्षे सूट
MahaTransco Recruitment महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख- 07-02-2023
- अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख- 01-03-2023
MahaTransco Recruitment अर्ज करण्याची पद्धत –
- अर्ज करण्याची पद्घत ही ऑफलाइन पोस्टाद्वारे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता - कळवा: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई-400708
- बोईसर: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैरापाडा, मु. विद्यानगर, पो.सरावली. ता. पालघर, जि. पालघर-401501
MahaTransco Apprentice विजतंत्री साठी लागणारे कागदपत्रे –
- 10 वी व ITI विजतंत्री उत्तीर्ण गुणपत्रक
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधारकार्ड
- मागासवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवा-यांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून आपलोड करावे.
- तसेच उमेदवारांनी संकेत स्थळावर Online Registration( http://www.apprenticeshipindia.org) ची नोंदणी केल्याची प्रत तसेच या नोटीस सोबत जोडलेल्या अर्ज भरून त्यासोबत शैक्षणीक अर्हता धारण केल्याची गुणपत्रिका / प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रत व इतर कागदपत्र दि. 01-03-2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.