Kisan News: भारत हा कृषीप्रधान देश आहे. पण ह्या कृषीप्रधान देशातील शेतकरी हे अवकाळी आणि सततच्या पावसामुळे त्रस्त झाले आहेत. ह्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकरी आणखीनच कर्जबाजारी होत आहे आणि शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तुंच्या महागाईमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सततच्या पडणाऱ्या पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषीत केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे याची माहिती आपण पुढे घेणार आहोत.
Kisan News: महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारने नैसर्गिक आपत्तीची व्याख्याच बदलली असून यापुढे सततच्या पडणाऱ्या पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सलग पाच दिवस 10 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) समजली जाईल.
हे नक्की वाचा: मोबाईल द्वारे करा शेतजमिनीची मोजणी.
Kisan News: राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत जाहिर करता येईल. यापूर्वी अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे सरकारला शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत जाहीर करता येत नव्हती. त्यामुळे शेत पिकाचे नुकसानीचे पंचनामे करण्यात खूप वेळ जायचा आणि शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळत नव्हती. पण आता या निर्णयामुळे थोडी परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.