Join WhatsApp Group

Vari Yojana 2023: वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची विशेष योजना, वाचा संपूर्ण माहिती.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Vari Yojana 2023: आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी पंढरपूरला मोठ्या प्रमाणात वारकरी जात असतात. ह्या वर्षी पण वारकरी मोठ्या संख्येने पायी-पायी पंढपूरला जात आहेत. या सर्व वारकऱ्यांनासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आषाढी एकादशी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे वारकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागून करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत केली आहे. काय आहे ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’? कसा मिळणार लाभ? या सर्व बाबींची माहिती आपण पुढे घेणार आहोत, त्यामुळे आपण ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

काय आहे ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’? (Vari Yojana 2023)

महाराष्ट्र शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडून ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ राबविली जाणार आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे. विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना 2023 अंतर्गत आषाढी एकादशी वारीच्या वेळी झालेल्या एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेमध्ये वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा इतर काही इजा झाल्यास वारकऱ्याच्या वारसदारास मदत म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

हे पण वाचा: शेतकऱ्यांना मिळणार ₹1,500 कोटीपर्यंत नुकसानभरपाई.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

  1. आषाढी एकादशी वारीमध्ये एखादया वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ₹05 लाखांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात येणार.
  2. वारी दरम्यान झालेल्या दुर्घटनेत कायमचे अपंगत्व आल्यास ₹01 लाख सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
  3. दुर्घटनेत अंशत अपंगत्व आल्यास ₹50 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
  4. वारी दरम्यान वारकरी आजारी पडल्यास त्यांच्या औषधोपचारासाठी ₹35 हजारांपर्यंत खर्च दिला जाईल.
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ (Vitthal Rukmini Varkari Vima Chatra Yojana) या योजनेची माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा, आणि अशाच सरकारी योजनां विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

Rate this post

Leave a Comment