शेत जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा बघायचा?
Step 1 : शेत जमिनीचा नकाशा बघण्यासाठी सगळ्यात आधी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा त्यानंतर भू नकाशा वेबसाईट वरती, तेथे तुम्हाला खूप सारे पर्याय उपलब्ध होतील.
Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड ऑन करा. त्याने तुम्हाला संपूर्ण माहिती चांगली दिसेल.
Step 3 : खाली दिलेल्या प्रमाणे तेथे तुम्हाला तीन लाईन चा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा,
हे पण बघा : शेतकऱ्यांसाठी 05 शेतीपूरक व्यवसाय जे शेतकऱ्यांना बनवतील मालदार.
Step 4 : तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका, जिल्हा आणि तुमचा गाव निवडायचा आहे.
Step 5 : सर्व पर्याय निवडल्यानंतर थोडा वेळ त्या वेबसाईट वरती थांबा कारण सरकारी आयुष्यात असल्यामुळे वेबसाईट वरती लोड येत असतो, त्यानंतर तुम्हाला तेथे ऑटोमॅटिक तुमच्या गावाचा नकाशा दिसायला सुरुवात होईल.
Step 6 : खालील दिल्याप्रमाणे तुमच्या प्लॉट नंबर सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या शेतीची हद्द बघू शकतात.
नक्की बघा : पेरू लागवड करा आणि वर्षभर चांगले व स्थिर उत्पन्न मिळवा
अश्या प्रकारे तुम्हाला नकाशा दिसेल :
तर शेतकरी मित्रांनी तुम्ही अशा प्रकारे तुमच्या शेत जमिनीची ऑनलाइन मोजणी करू शकतात, तर मित्रांनो How to check land record online ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती तुमच्या गावांमधील प्रत्येक व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या गावांमधील लोकांची सुद्धा मदत होईल मी अशाच माहितीसाठी आपली सर्विस या वेबसाईट वरती दररोज भेट देत रहा.