Digital Crop Survey App : महाराष्ट्र राज्याचे भूमि अभिलेख विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करिता डिजिटल क्रॉप सर्वे ॲप (Digital Crop Survey App) लॉन्च केलेला आहे, डिजिटल क्रॉप सर्वे ॲप द्वारे तुम्ही तुमच्या शेतातील पिकांची अचूक माहिती त्यामध्ये भरू शकतात, डिजिटल क्रॉप सर्वे ॲप हा इपिक पाहणी सारखाच आहे, या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची सविस्तर माहिती राज्य सरकारकडे पोहचेल, या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्यातील उन्हाळी हंगामा च्या 34 तालुक्यांमधील साडेतीन हजारहून अधिक गावातील बळीराजांच्या पिकांची नोंदणी करून GIS नकाशे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातील.
Digital Crop Survey App चा शेतकऱ्यांना फायदा काय आहे?
डिजिटल क्रॉप सर्वे ॲप द्वारे शेतकऱ्यांच्या पिकांची लागवड केलेल्या क्षेत्रांची अचूक माहिती ही नोंदणी केली जाईल, यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारला पिकांची लागवड किती झाली हे माहिती होईल यामुळे राज्य सरकारला समजेल की उत्पादनात किती चांगली वाढ झालेली आहे, त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे भूमी अभिलेख विभागांतर्गत योजना या आखल्या जातील, डिजिटल क्रॉप सर्वे ॲप शेतकऱ्यांना सहजपणे वापरता येईल हे ॲप्लिकेशन वापरणे अगदी सोपे आहे, हे तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे वापरू शकतात
याचा सगळ्यात मोठा फायदा हाच की तुम्हाला कोणत्याही पिकांची नोंदणी करण्याकरिता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, जसे तुम्ही इ पीक पाहणी वरती नोंदणी करत होते , तसेच तुम्ही घर बसल्या तुमच्या शेतातून तुमच्या पिकांचे डायरेक्ट माहिती सरकारपर्यंत पोहोचू शकतात यामुळे तुमचा वेळ आणि पैसा सुद्धा वाचेल, या उपक्रमाद्वारे जे काही सरकारी कार्यालयात गैरव्यवहार होतात ते टाळले जातील हाच उद्देश महाराष्ट्र राज्य सरकारचा आहे.
एआय चॅटबॉट जो शेतकऱ्यांचे जीवन बदलणार, वाचा संपूर्ण माहिती
डिजिटल क्रॉप सर्वे ॲप चा वापर कसा करावा?
“डिजिटल क्रॉप सर्वे ॲप” तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करावा लागेल (digital crop survey app download), मग तुम्हाला तेथे तुमची नोंदणी करावी लागेल, मग तिथे तुम्हाला तुमच्या गावाला सिलेक्ट करावे लागेल, मग त्यानंतर तुमचा गटाचा क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या पिकाची नोंदणी करण्याकरिता ऑप्शन येईल, तेथे मग तुमच्या पिकांचे फोटोज अपलोड करू शकता तुम्ही सोबतच त्या पिकांची माहिती सुद्धा भरू शकता. सर्व माहिती आणि फोटोज अपलोड केल्यानंतर ती माहिती सबमिट करून द्या मग ती माहिती डायरेक्ट महाराष्ट्र राज्य सरकारकडे पोहोचेल..
पीएम आवास योजनेचे नवीन नियम आणि पात्रता आत्ताच अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या !!
मित्रांनो तुम्हाला माहिती झालेच असेल की डिजिटल क्रॉप सर्वे ॲप (Digital Crop Survey App) काय आहे आणि त्या चा फायदा काय तर मित्रांनो ही कामाची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपली सर्विस वेबसाईटला व्हिजिट करत रहा.