Compensation 2023: महाराष्ट्र राज्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानभरपाईसाठी नविन सुधारित दर व निकष शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ₹1500 कोटी रक्कम नुकसानभरपाई साठी मंजुर करण्यात आली आहे. याचा फायदा 27.36 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
Compensation 2023: राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत जाहिर करता येईल. यापूर्वी अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे सरकारला शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत जाहीर करता येत नव्हती. त्यामुळे शेत पिकाचे नुकसानीचे पंचनामे करण्यात खूप वेळ जायचा आणि शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळत नव्हती. पण आता या निर्णयामुळे थोडी परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हे पण पहा: PM Kisan e-KYC करण्याची सोपी पद्धत.
शेतकर्यांना पुढील प्रमाणे सुधारित नुकसान भरपाई ही मिळणार आहे.
- जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 02 हेक्टरच्या मर्यादेत ₹6,800/- प्रतिहेक्टरऐवजी ₹8,500/- नुकसान भरपाई मिळणार.
- बागायत पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ₹13,500/- प्रतिहेक्टरऐवजी ₹17,000/- प्रतिहेक्टर मिळणार.
- बहुवार्षिक पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ₹18,500/- प्रतिहेक्टरऐवजी ₹22,500/- प्रतिहेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे.
कृषी योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांना देखील शेअर करा, व अशाच आवश्यक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.