Shelipalan Yojana: शेळी पालन योजनेला शासनाची इतक्या अनुदानाची मंजूरी, वाचा संपूर्ण माहिती.

Shelipalan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते. त्यातच आता शासनाने शेळी व मेंढी पालन अनुदानासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेळी पालन योजनेचा लाभ घेता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शेळी-मेंढी पालन योजनेचा विषय चांगलाच चर्चेत होता, त्यातच मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत शेळी-मेंढी पालन योजनेला अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्य शासन ₹4,500 कोटी देणार आहे. शेळी-मेंढी पालन योजनेला किती अनुदान मिळणार? याची माहिती आपण पुढे घेणार आहोत.

Shelipalan Yojana: शेळी पालन योजनेसाठी राज्य शासन महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास सहकारी महासंघ स्थापन करणार आहे. शेळी पालन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीबरोबरच एक जोडधंदा उपलब्ध असावा. त्यामुळे महाराष्ट्र शासन शेळी व मेंढी पालनासाठी प्रोत्साहनपर अनुदान देत आहे.

हे पण वाचा: वारकऱ्यांसाठी विशेष योजना.

शेळीपालनासाठी पुढील प्रमाणे अनुदान देण्यात येईल.

  • शेळी व मेंढी पालनासाठी राज्य शासन लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान देणार आहे, म्हणेजच जर शेळी पालनासाठी ₹01 लाख खर्च येत असला तर राज्य शासनातर्फे ₹75 हजार रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थ्यास मिळेल.
  • शेळी व मेंढी पालन योजनेचा लाभ हा राज्यातील 06 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • शेळी व मेंढी पालन योजनेसाठी ₹06 हजार कोटींचा खर्च येणार आहे, यासाठी राज्य शासन ₹4,500 कोटी देणार तर ₹1,500 कोटी लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे.

हे पण बघा: शेतकऱ्यांना मिळणार ₹1500 कोटी नुकसानभरपाई.

सरकारी योजना WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेळी पालन व मेंढी पालन योजनेची माहिती राज्यातील सर्व शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपण इतर मित्रांनादेखील शेअर करा. व अशाच सरकारी योजनांविषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

FAQ About Shelipalan Yojana 2023

Q.1. शेळीपालन योजनेला किती अनुदान मिळणार?

Ans. शेळीपालन योजनेला 75 टक्के अनुदान ग

Q.2. शेळी पालन योजनेसाठी शासनाने किती मंजूरी दिली आहे?

Ans. ₹4,500 कोटी

Q.3. शेळी व मेंढी पालन योजनेसाठी शासन कोणतं महासंघ स्थापन करणार आहे?

Ans. शेळी पालन योजनेसाठी राज्य शासन महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास सहकारी महासंघ स्थापन करणार आहे.

Rate this post

Leave a Comment