Bailgadi Yojana 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे म्हणून सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्यामुळे शेतकर्यांना या योजनांचा फायदा घेऊन शेती करणे आणखीनच सोपे होईल. अशीच एक शासनातर्फे योजना राबवण्यात येत आहे ती म्हणजे बैलगाडी अनुदान योजना. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी लोखंडी बैलगाडी घेण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार. बैलगाडी योजनेसाठी पात्रता काय आहे? बैलगाडी योजनेसाठी अर्ज कोठे करावा? याची माहिती घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.
हे पण वाचा: शेतीपूरक 07 व्यवसाय जे शेतकऱ्यांना करतील मालामाल.
Bailgadi Yojana 2023 :
बैलगाडी अनुदान योजना ही एक शेतीपूरक अशी योजना. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे सोपे जाईल. या बैलगाडी अनुदान योजना द्वारे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बैलगाडी मिळणार आहे. लोखंड बैलगाडी योजना सध्या जिल्हा स्तरावर लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालयात जावे.
लोखंडी बैलगाडी योजनेसाठी पात्रता:
लोखंडी बैलगाडी अनुदान योजना सध्या मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे. म्हणजेच अर्जदार हा मागासवर्गीय शेतकरी असला पाहिजे. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे.
नक्की बघा: पोस्ट ऑफिस योजनांवर देणार इतके व्याज.
लोखंडी बैलगाडी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पात्र अर्जदारांनी आपल्या जवळच्या समाजकल्याण कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करावा.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनांविषयक माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.
बैलगाडी योजनेसंबंधित प्रश्न FAQ.
लोखंडी बैलगाडी योजना साठी अनुदान किती मिळते?
➥ बैलगाडी खरेदी साठी अनुदान 100% पर्यंत मिळते, तसेच अनुदान रक्कम ही ₹30,000 ते ₹35,000 इतकी असते.
बैलगाडी अनुदान योजना शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे राबविली जाते?
➥ महाराष्ट्र समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद महाराष्ट्र.
Bailgadi anudan yojana साठी पात्रता काय आहे?
➥ अर्जदार शेतकरी हा मागासवर्गीय असावा.
बैलगाडी योजनेसाठी अर्ज कोठे करावा?
➥ बैलगाडी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी समाजकल्याण कार्यालयात जावे